बदलापूर: उल्हास प्रभात चा यावर्षीचा 26 वा दीपावली विशेषांक 2020 प्रसिद्ध झाला असून या अंकामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या जेजुरी येथील श्री खंडोबारायांचे आकर्षक मुखपृष्ठ व स्टोरी असून दीपावली विशेषांका मध्ये अनेकांनी कथा, कविता, लेख लिहिले आहेत.
जर्मनी येथील प्रसिद्ध लेखक मिलिंद कपाले यांनी लिहिलेली तो आणि ती कथा, जपा माणुसकी हे विशेष संपादकिय मोटिवेशनल गुरु डॉ. श्री. गुरूनाथ बनोटे यांनी लिहिले असून या अंकामध्ये सुरेश देहेरकर, अनिल जावकर, प्रकाश सप्रे, किरण गायकर, डॉ. शीतल मालुसरे, राजेंद्र वैद्य, अनुजा सावंत आदींचे साहित्य असून, एड. ज्योतिषाचार्य सोपानदेव बुडबाडकर यांनी यावर्षी चे वार्षिक राशिभविष्य लिहिले आहे.
रामकृष्ण पाटील, मनोहर मोहरे, संजय कुमार चौधरी, उमेश पारसकर, उदय हाटकर, आनंद देशमुख, तुकाराम खिल्लारे, हर्षद शेटे, सुहासिनी मानकामे, वृषाली वेदपाठक, बाबु डिसोजा, राहुल शेवाळे आदींच्या कवितांचा या अंकात समावेश आहे.
किंमत फक्त 60/- रुपये
मोटिवेशन गुरु संपादक डॉ. श्री. गुरुनाथ पांडुरंग बनोटे