Corona : बदलापूरमध्ये कोरोनाचे आठ नवीन रुग्ण




  •  





 

 








बाधितांच्या संपर्कात आल्याने लागण


बदलापूर : गेल्या आठवड्यात बदलापुरात आढळलेल्या तीन करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आठ नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे गुरुवारी संध्याकाळी अहवालात समोर आले. तसेच या सर्व रुग्णांना गेल्या आठवड्यापासून नगरपालिकेच्या बीएसयूपी येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. नगरपालिकेने पाठवलेल्या एकूण १३ संशयित रुग्णांपैकी आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून सहा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे बदलापुरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ११ झाली आहे.